पुणे : मंचर येथील शेतमजुरच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी घनश्याम हरिदास निकम रा. नागपूर याच्याविरोधात पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
यावेळी मिळालेल्या माहितीनुसार, शेतमजुर कुटुंब नागपूर गावच्या हद्दीत निकम यांच्या शेतामधील खोलीत राहत होते. अल्पवयीन मुलीचे कुटुंब हे घनश्यमाच्या शेतात काम करीत होते. घनश्याम निकम याने दहा ते पंधरा दिवसांपूर्वी नागपूर गावचे हद्दीत शेतातील रुममध्ये दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पंधरा वर्षाच्या मुलीवर जबरदस्ती करुन बलात्कार केला.
मुलीने विरोध केला तरीसुद्धा निकम याने तिच्यावर बळजबरी केली. सदर पीडित मुलीने फिर्याद दिल्यानंतर घनश्याम हरिदास निकम याच्याविरोधात पारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील करीत आहेत.