लोणी काळभोर : मराठी माणूस धंदा करू शकत नाही, ही भावना मनातून काढून टाका. यश हे कोणाचीही मक्तेदारी नाही. जगात कोणीही सर्व काही आईच्या पोटात शिकून आले नाही. जर तुमच्याजवळ जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल, तर तुम्हीही व्यवसायामध्ये प्रगती करू शकता, असे मत हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काळभोर यांनी मांडले.
कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील गणेश थाळी (पावभाजी) या हॉटेलचे उद्घाटन तालुकाध्यक्ष राजेंद्र काळभोर यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.२) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी गणेश थाळीचे मालक रामदास कोरे, राजेंद्र हजगुडे, मंगेश कदम, विशाल वेदपाठक, अनिल गायकवाड, बाळासाहेब ओलेकर. अनिल पवार, स्वप्निल कदम, अभिजित शितोळे, योगेश कदम, गणेश कोरे, मोनाली कदम, मीनाक्षी सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना काळभोर म्हणाले, कोणत्याही धंद्यात यश संपादन करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबी अंगिकारल्या की यश सहज मिळते. परंतु , दुर्दैवाने मराठी माणूस उद्योगधंदा करू शकत नाही, असे म्हटले जाते. परंतु, ही एक दंतकथा आहे. यासाठी आपणच आपली दृष्टी, विचारसरणी बदलायला हवी. असे काळभोर यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी मराठी तरुणांना व्यवसायामध्ये उतरण्यासाठी आवाहन त्यांनी केले. काळभोर यांनी गणेश थाळी मालक कोरे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.