धाराशिव : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच पक्षातील जागावात अंतिम टप्प्यात आले आहे. परंतु महाविकास आघाडीमध्ये मात्र जागावाटपावुन सार काही आलबेल आहे असं नसून तिढा कायम आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने भुम परंडा वाशी मतदारसंघातुन माजी आमदार दिवंगत ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजीत पाटील यांना उमेदवारी घोषित केली असुन एबी फॉर्म दिला आहे. पाटील हे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीचा घटक असलेल्या शिवसेनेने उमेदवारी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल मौष्टे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदार संघात मैत्रीपुर्ण लढत शक्यता होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाटील व मोटे हे दोघे निवडणूक लढवण्यावरून ठाम आहेत. यामध्ये माघार कोण घेणार? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
परंडा या मतदारसंघात मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी एकास एक लढत होणार अशी स्तिथी असतानाच मात्र राहुल मोटे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मैत्रीपुर्ण लढतीच्या चर्चेला उधाण आले आहे. सलग 3 टर्म आमदार असतानाही माजी आमदार राहुल मोटे यांचे नाव राष्ट्रवादी पक्षाने जाहीर केले नाही. परंतु सेनेने उमेदवार जाहीर केला व खुद्द पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना एबी फॉर्म दिला आहे. परंडा मतदार संघात महायुतीकडुन शिवसेनेचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, त्यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सलग 3 टर्म आमदार राहिलेले व त्यांनंतर 1 वेळेस विधानसभा लढविलेले राहुल मोटे यांना नाकारून रणजित पाटील यांना महाविकास आघाडीकडुन उमेदवारी जाहीर केल्याने अनेकांन धक्का बसला आहे. राहुल मोटे हे 2004, 2009, 2014 असे सलग 3 टर्म आमदार होते, तर त्यांचे वडील महारुद्र बप्पा मोटे हे 1985 व 1990 असे 2 टर्म आमदार राहिले आहेत. त्यानंतर 1995 व 1999 असे टर्म ज्ञानेश्वर पाटील हे आमदार होते. त्यांचे 3 ऑक्टोबर रोजी निधन झाले आहे. त्यांचे पुत्र रणजीत पाटील यांना शिवसेना उबाठा गटाने उमेदवारी दिली आहे.