पुणे : गेल्या पंधरा दिवसात सोन्याच्या भावात तब्बल दीड हजार रुपयांची वाढ झाल्याने सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार असल्याचे चित्र आहे. आगामी लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर लग्नाची तयारी करणाऱ्यांना सोने खरेदी करताना हात जास्त मोकळा सोडावा लागणार आहे.
सोन्याचा भाव ५२, ५०० रुपये प्रतितोळा इतका झाला आहे. तर चांदीच्या भावातही एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्या-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा परिणाम सोने चांदीच्या दरावर पहायला पाहिला मिळत आहे. गेल्या पंधरा दिवसात सोन्याचे भाव पंधराशे रुपयांनी वाढले आहेत. तर, पुढील काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरात अजूनही वाढ होण्याची शक्यता सोने व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सणासुदीचा परिणाम व्यवसायावर होत असून देशांतर्गत सोन्या-चांदीच्या मागणीत वाढ होत आहे. दिवाळी देखील सणापूर्वी करवा चौथ आणि धनत्रयोदशीच्या सणाला लोक सोन्या-चांदीचे दागिने आणि नाणी, बिस्किटांची खरेदी करतात, त्यामुळे सराफा बाजारात चमकत असते. आता लग्नसराईचा हंगाम सुरु असताना सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.