जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीरमध्ये एक धक्कादायक घटना समोर येत आहे. किष्टवाड वरून जम्मूकडे जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला आहे. दोडा जिल्ह्यातील असार परिसरात त्रंगलजवळ एक प्रवासी बस 250 मीटर खोल दरीत कोसळली आहे. या भीषण अपघातात २० पेक्षा जास्त प्रवासी दगावल्याची भिती वर्तवण्यात येत असून स्थानिक अधिकारी, पोलिस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले आहे. (Jammu Kashmir Bus Accident)
प्राथमिक मिळालेल्या माहितनुसार, जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. किश्तवाडहून जम्मूला जाणारी बस दोडा जिल्ह्यातील आसार भागातील त्रंगलजवळ रस्त्यापासून 250 मीटर खोल दरीत कोसळली. अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भिती वर्तवण्यात येत आहे.
या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथकांसह स्थानिक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. डोडा येथील पोलिस नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या प्राथमिक अहवालानुसार मृतांची संख्या २० हून अधिक असू शकते. सध्या बचावकार्य सुरू आहे. याअपघाताबाबत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली आहे. जखमींना आवश्यकतेनुसार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात येत आहे.
#UPDATE | 25 bodies recovered so far, rescue operation going on: J&K Police https://t.co/QoVr82Dkyb
— ANI (@ANI) November 15, 2023