मुंबई : येथील मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळील मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या कामासाठी खड्डा खोदण्यात आलाय. त्या खड्ड्यात पडून सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्याच्या काकाने ट्रेनखाली जावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पुतणा आयुषचा मृत्यू झाल्यामुळे काका शैलेश शेगोकार हे नैराश्यात गेले. आयुषच्या मृत्यूनंतर त्याचा काका शैलेश शेगोकरने लोकल ट्रेनखाली उडी मारून आत्महत्या केलीय. शैलेशने रविवारी सायंकाळी आत्महत्या केली.
आयुषच्या काकाने चेंबूर आणि गोवंडीच्या मध्यावर ट्रेनखाली आत्महत्या केलीय. आयुषच्या मृत्यूनंतर शेगोकार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. आयुष हा त्याच्या काकाकडे राहत होता