Sunday, November 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील हातभट्टी दारू विक्रेत्याची एक वर्षासाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहात रवानगी

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 22 November 2026, 11:40

लोणी काळभोर : पोलिसांच्या वारंवार प्रतिबंधात्मक कारवाईला न जुमानता बेकायदेशीर हातभट्टी दारू विक्रीचा व्यवसाय सुरूच ठेवणाऱ्या सराईत व्यावसायिकाला लोणी काळभोर पोलिसांनी अखेर दणका दिला आहे. त्याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतच्या (एमपीडीए) कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले असून, त्याची ठाणे मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक समाधान पवार यांनी दिली आहे.

सुरेश रुपा बिरे (वय 60, रा. नांदेपाटील वस्ती, आर्या हॉटेलमागे, रामदरा रोड, लोणी काळभोर) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या दारू व्यवसायिकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सराईत गुन्हेगार, अवैध हातभट्टी दारू विक्रेते, अंमली पदार्थ विक्रेते आणि समाजात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. त्यानुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरेश बिरे हा वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही बेकायदेशीर हातभट्टी दारू विक्रीचा व्यवसाय सुरू ठेवत होता. त्याच्या या कृत्यांमुळे परिसरातील नागरिकांचे आर्थिक व शारीरिक नुकसान होत होते. तसेच अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती.

या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी सुरेश बिरे याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करून पोलीस आयुक्तांकडे पाठविला होता. या प्रस्तावाला मंजुरी देत पोलीस आयुक्तांनी त्याला एक वर्षासाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, स्थानबद्धतेचे आदेश जारी झाल्यानंतर सुरेश बिरे हा पोलिसांना मिळून येत नव्हता. त्यामुळे सध्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शोध पथक नियुक्त करण्यात आले. या पथकाने शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले असून, आदेशानुसार त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

सदरची कारवाई पुणे शहर पोलीस उपआयुक्त डॉ. जीवन बेनीवाल, लोणी काळभोरच्या सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक समाधान पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नंदकुमार कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गोडसे, पोलीस हवालदार विलास शिंदे, स्वाती पिसाळ पोलीस अंमलदार प्रशांत नरसाळे, पोलीस अंमलदार योगेश लवांडे यांच्या पथकाने केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

इंदापूर येथे सात टन पेरूच्या बागेवर चोरट्यांचा डल्ला! शेतकऱ्याचे 3 लाख 78 हजार रुपयांचे नुकसान

Sunday, 22 November 2026, 16:10

मुंबईकरांनो सावधान! उघड्यावर शेकोटी पेटवल्यास खिशाला बसणार मोठा फटका; प्रशासनाकडून हजारोंचा दंड..

Sunday, 22 November 2026, 16:01

भाजपच्या महापौरांनी उचललं टोकाचं पाऊल? विष प्राशन केल्याचा आमदारांचा मोठा खुलासा,नेमकं घडलं काय?

Sunday, 22 November 2026, 15:21

विहिरीत पडलेल्या दुर्मिळ ‘जवाडी मांजरा’ला जीवदान; वनविभाग आणि सर्पमित्रांची यशस्वी रेस्क्यू मोहीम!

Sunday, 22 November 2026, 14:59

सोनं खरेदीची सुवर्णसंधी!आठवडाभरात तब्बल 10% घसरण; ग्राहकांची चांदी, आणखी स्वस्त होणार सोनं?

Sunday, 22 November 2026, 14:49

अन् बॉयफ्रेंडनं प्रेयसीचं घर पेटवलं! ब्रेकअप केल्यानं डोकं सटकलं अन् आई-वडील घरात असतांनाच घराला आग लावत…

Sunday, 22 November 2026, 14:38
Next Post

अतिक्रमण पुन्हा केले, तर थेट टाळे! आयुक्त नवलकिशोर राम यांचा व्यावसायिकांना इशारा; आस्थापना सील करून गुन्हे दाखल करणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp