Sunday, November 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबईकरांनो सावधान! उघड्यावर शेकोटी पेटवल्यास खिशाला बसणार मोठा फटका; प्रशासनाकडून हजारोंचा दंड..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 22 November 2026, 16:01

मुंबई : महानगरपालिकेने शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. हिवाळ्याची चाहूल लागताच वातावरणात गारवा वाढू लागला असून, हवेची गुणवत्ता खालावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, महापालिकेने संपूर्ण मुंबईत एकूण 74 विशेष पथकांची नियुक्ती केली आहे. शहर भाग, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर अशा सर्वच भागांत ही पथके बारीक लक्ष ठेवून असणार आहेत.

थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक जण सार्वजनिक ठिकाणी शेकोटी पेटवतात, तर काही ठिकाणी कचरा जाळण्याचे प्रकार घडतात. या धुरामुळे हवेतील प्रदूषणाची पातळी झपाट्याने वाढते. ही समस्या रोखण्यासाठी प्रशासनाने दंडाच्या रकमेत मोठी वाढ केली आहे. यापूर्वी उघड्यावर कचरा जाळणे किंवा शेकोटी पेटवण्यासारख्या कृत्यांसाठी 500 रुपये दंड आकारला जात होता. मात्र, आता हा दंड थेट 2,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना उघड्यावर आग लावणे आता चांगलेच महागात पडणार आहे.

वायू प्रदूषण कमी करण्यासाठी प्रशासनाने केवळ नागरिकांवरच नाही, तर व्यावसायिकांवरही निर्बंध घातले आहेत. बांधकाम व्यावसायिक, विविध कंपन्या, दुकानदार आणि सर्वसामान्य रहिवासी यांच्यासाठी महापालिकेने 28 नियमांची नियमावली जारी केली आहे. या सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होत आहे की नाही, याची पाहणी नेमलेली पथके करतील.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात अत्यंत कठोर कारवाई करण्याचे संकेत पालिकेने दिले आहेत. यामध्ये संबंधितांना नोटीस बजावणे, सुरू असलेले काम तात्काळ थांबवणे आणि जागेवरच आर्थिक दंड वसूल करणे अशा कारवाईचा समावेश आहे. मुंबईची हवा स्वच्छ आणि निरोगी राहण्यासाठी सर्व नागरिकांनी तसेच बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मुंबईकरांनो सावधान! उघड्यावर शेकोटी पेटवल्यास खिशाला बसणार मोठा फटका; प्रशासनाकडून हजारोंचा दंड..

Sunday, 22 November 2026, 16:01

भाजपच्या महापौरांनी उचललं टोकाचं पाऊल? विष प्राशन केल्याचा आमदारांचा मोठा खुलासा,नेमकं घडलं काय?

Sunday, 22 November 2026, 15:21

विहिरीत पडलेल्या दुर्मिळ ‘जवाडी मांजरा’ला जीवदान; वनविभाग आणि सर्पमित्रांची यशस्वी रेस्क्यू मोहीम!

Sunday, 22 November 2026, 14:59

सोनं खरेदीची सुवर्णसंधी!आठवडाभरात तब्बल 10% घसरण; ग्राहकांची चांदी, आणखी स्वस्त होणार सोनं?

Sunday, 22 November 2026, 14:49

अन् बॉयफ्रेंडनं प्रेयसीचं घर पेटवलं! ब्रेकअप केल्यानं डोकं सटकलं अन् आई-वडील घरात असतांनाच घराला आग लावत…

Sunday, 22 November 2026, 14:38

बारामतीत माजी सैनिकासोबत घडलं भयंकर! दागिन्यांच्या दुकानातून बाहेर पडताच दोघांनी गाठलं; पोलीस असल्याचं सांगत झडती घेतली अन्…

Sunday, 22 November 2026, 14:36
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp