बुलडाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, या घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे. एका 55 वर्षीय नराधमाने 16 महिन्यांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी नराधमाला बेड्या ठोकल्या असून, पुढील तपास सुरु आहे.

मंगळवारी सकाळच्या सुमारास जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात ही घटना घडली. पोलिसांची या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, ‘आरोपीने ‘आंबा खायला देतो’ असे आमिष दाखवून त्या लहान मुलीला आपल्या घरी नेले. काही वेळातच मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून आई तिच्या जवळ गेली. तेव्हा तिला हा प्रकार लक्षात आला आणि ती हादरून गेली. आईने तात्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत.
राज्यात दिवसेंदिवस अशा घटना वाढत असून, नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. अशा घटना कुठेतरी थांबायला हव्यात यासाठी सरकराने मोठे पाऊल उचलेल पाहिजे अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे.

दरम्यान, जळगाव मधील या घटनेवर तीव्र संताप व्यक्त होत असून, माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या नराधमाला कठोर शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी सर्वच स्तरातून करण्यात येत आहे.








