सुरेश घाडगे
परंडा : भैरवनाथ शुगरच्या सोनारी (ता. परंडा) व वाशी येथील युनिटकडून गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना प्रति टन ४०० रुपयाप्रमाणे वाढीव हप्ता देण्यात येणार आहे. अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव सावंत यांनी दिली आहे.
चालू गळीत हंगामात (२०२२-२३) ऊसासाठी पहिली उचल २२०० रुपये प्रति मेट्रिकटन या प्रमाणे वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, आरोग्य मंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भैरवनाथ शुगरचे सर्वेसर्वा प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी वरील निर्णय जाहीर केल्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना ( शिंदे गट ) उस्मानाबाद जिल्हाप्रमुख तथा जि.प. माजी सभापती दत्ता साळुंके यांनी पुणे येथील संपर्क कार्यालयात सावंत यांचा सत्कार केला. आणि वरील निर्णयाचे स्वागत केले.
यावेळी परंडा तालुकाप्रमुख आण्णासाहेब जाधव, सतिश दैन, हभप दत्ता रणभोर आदि उपस्थित होते .