सुरेश घाडगे
परंडा : भैरवनाथ शुगर, सोनारी व वाशी या दोन युनीटचा गत गळीत हंगाम २०२१-२२ साठी प्रति टन ४०० रुपय प्रमाणे हप्ता देणार तर चालु गळीत हंगाम २०२२-२३ साठी पहिली उचल २२०० रुपये प्रति मे टन शनिवार ( दि.५ ) प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केली आहे. यामुळे गत गळीत हंगामातील एकूण दर २४०० रुपये प्रति मेट्रीक टन झाला आहे. वाढीव हप्ता द्यावा अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी वर्गातून होती.
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी वाढीव हप्त्यासाठी मागणीसाठी परंडा येथे मोर्चा काढला होता. कारखाना शुभारंभ मोळी कार्यक्रमात चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत यांनी लवकरच आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री निर्णय घेवून आदेश देतील व वाढीव हप्ता काढण्यात येईल असे आश्वासन दिले होते. या अनुषंगाने ४०० रुपये वाढीव हप्ता जाहिर केल्याने ऊस उत्पादक शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करीत आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे कि, भैरवनाथ शुगर वर्क्स लि. सोनारी, ता. परंडा व भैरवनाथ शुगर वर्क्स लि. ( शिवशक्ती ) वाशी या युनीटने मागील हंगाम २०२१-२२ मधील शासन निर्णयानसार निव्वळ एफ.आर.पी. ची रू. २००० रुपय प्रती मेट्रीक टनाप्रमाणे संपूर्ण ऊस बिल रक्कम ऊस पुरवठादारांना अदा केलेली आहे.
कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तथा आरोग्य मंत्री व पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे सुचनेनुसार व चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत यांनी गाळप हंगाम २२-२३ चे शुभारंभाचे कार्यक्रमात जाहीर केल्याप्रमाणे सोनारी व वाशी युनिट साठी हंगाम २०२१-२२ चे ऊसाला एफ.आर.पी. पेक्षा जादा ४०० प्रति टनाप्रमाणे हप्ता देण्याचे ठरले आहे. प्रति टन ४०० हप्ता रक्कम ही दोन टप्प्यात अदा केली जाणार असून पुढील आठवडाभरात २०० रूपये हप्ता शेतकऱ्यांचे खातेवर जमा केला जाईल.
उर्वरित रक्कम २०० रुपये हप्ता गुढीपाडव्याला अदा केला जाणार आहे.तसेच चालू हंगाम २०२२-२३ साठी गळीतास येणाऱ्या उसास पहिली उचल २२०० रुपये प्रति मेट्रिक टन राहील. अशी माहिती कारखान्याचे चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत यांनी दिली. तरी भागातील उस उत्पादक शेतकरी, सभासद यांनी चांगल्या प्रतिचा उस कारखान्यास देवून गळीत हंगाम यशस्वी करण्यास सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
कार्यकारी संचालक तथा जि.प. माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत म्हणाले कि, भैरवनाथ शुगर, सोनारी व वाशी युनीटने यापुर्वीचे हंगामात एफआरपी पेक्षा जादा दर देवून शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. शेतकऱ्यांना किफायतीशीर ऊस दर देणे ही आमची प्राधान्यक्रमाची बांधिलकी असून आम्ही शासनाचे नियम व धोरणांची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांचे उन्नतीसाठी निरंतर कटीबध्द आहोत.
वाढीव हप्ता द्यावा अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी वर्गातून होती. तसेच माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी या मागणीसाठी परंडा येथे मोर्चा काढला होता. कारखाना शुभारंभ मोळी कार्यक्रमात चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत यांनी लवकरच आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री निर्णय घेवून आदेश देतील व वाढीव हप्ता काढण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. या अनुषंगाने ४०० रुपये वाढीव हप्ता जाहिर केल्याने ऊस उत्पादक शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करीत आहे.