दिनेश सोनवणे
दौंड : स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त दौंड शहराच्या जवळ असणाऱ्या राज्य राखीव पोलिस बल प्रशिक्षण केंद्र नानवीज ( ता.दौंड) येथे पोलीस अधिकारी व शालेय विद्यार्थ्यांनी सायकल रॅली व वृक्षारोपण करून राष्ट्रीय मोहिमेची जनजागृती करण्यासाठी ‘हर घर तिरंगा’यात्रा काढण्यात आली. यावेळी तीनशे शालेय विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग घेतला होता.
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्या कारणाने संपूर्ण देशांमध्ये स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष, हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत संपूर्ण देशामध्ये विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. नानविज येथील प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रामचंद्र बाबू केंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस अधिकारी, अंमलदार (सत्र क्रमांक 62 व 63 चे प्रशिक्षणार्थी पोलीस उपस्थित होते.
दरम्यान, १३ ते १५ ऑगस्टला ‘आजादी का अमृत महोत्सव’‘हर घर तिरंगा झेंडा’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या जनजागृतीसाठी पोलीस अधिकारी व शालेय विद्यार्थी , देशप्रेमी, लहान थोर ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ सहभागी झाले होते. भारत माता की जय, वंदे मातरम, हर घर तिरंगा या घोषणा देण्यात आल्या.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुनर्वसन नानवीज ,विद्या विकास बाल मंदिर व भैरवनाथ विद्यालय गिरीम (ता दौंड) या शाळेतील एकूण तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या वेळी शालेय विद्यार्थ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले.