Tuesday, October 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंड येथे 300 किलो गोमांस जप्त, तिघांविरुद्ध गुन्हा, तर तीन गुरांची सुटका

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 4 October 2026, 13:04

दौंड : दौंड शहरातील भीमा नदीकाठावरील ईदगाह मैदानाशेजारील काटवनात सुरू असलेल्या कथित गोहत्येच्या प्रकारावर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल 300 किलो गोमांस जप्त करण्यात आले, तर कत्तलीसाठी आणलेल्या दोन खोंडांसह एका कालवडीची सुटका करण्यात आली. पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून तिघांनी पळ काढला असून, त्यांच्याविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस अंमलदार अमोल शहाणे यांच्या फिर्यादीनुसार आसिफ कासम कुरेशी, कय्यूम कुरेशी (दोघे रा. खाटीक गल्ली, दौंड) आणि दीपक जॉर्ज पिल्ले (रा. बेथल कॉलनी, दौंड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता.01) सायंकाळी ईदगाह मैदानाशेजारील काटवनात गोहत्या सुरू असल्याची माहिती गोरक्षकांनी पोलिसांना दिली. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पोलिस आल्याची चाहूल लागताच तेथील तिघे संशयित पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, तेथे सुमारे 300 किलो गोमांस आढळून आले. पोलिसांनी ते जप्त करून कत्तलीसाठी आणलेल्या तीन गुरांची सुटका केली.

दरम्यान, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जप्त केलेल्या गोमांसाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यानंतर उर्वरित गोमांस पोलिसांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आले.

 

आधीही गोहत्येचे गुन्हे दाखल

या प्रकरणातील संशयित आसिफ कुरेशी आणि कय्यूम कुरेशी यांच्याविरुद्ध यापूर्वीही गोहत्या, गोमांसाचा साठा, वाहतूक आणिविक्रीप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. फरार संशयितांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्र पोलिसांच्या धाडसाला आता राज्यस्तरावर ऐतिहासिक सन्मान! राज्य सरकारकडून ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ जाहीर

Tuesday, 6 October 2026, 22:20

पुणेकरांना आता मेट्रोची वाट पाहावी लागणार नाही! महामेट्रोचा प्रशासनाचा मोठा निर्णय; काय आहे प्लॅन?

Tuesday, 6 October 2026, 22:14

लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! अवैध दारू विक्री करणारा सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

Tuesday, 6 October 2026, 21:23

आर्वी येथील घटना! शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दहा वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू

Tuesday, 6 October 2026, 20:37

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीत महायुतीत उभी फूट! तिन्ही पक्षांचे उमेदवार आमनेसामने; भाजप, शिंदेसेना आणि अपक्ष लढतीत रंगत

Tuesday, 6 October 2026, 20:12

पूर्णेकरांच्या हत्येसाठी वापरलेलं पिस्तूल सापडलं! भावड्यानं डायरेक्ट पत्ताच सांगितला; खाक्या दाखवताच तोंड उघडलं, नेमकं काय घडलं?

Tuesday, 6 October 2026, 20:06
Next Post

Breaking News : पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना उमेदवारी जाहीर ; अनेक दिवसांपासून तयारी करणाऱ्या लाड यांना ऐनवेळी डावलले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp