लहू चव्हाण
पाचगणी : येथील शासकीय विश्रामगृहात १५ नोव्हेंबर रोजी आद्य क्रांतिवीर लहुजी साळवे यांची २२८ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली असून, यानिमित्ताने मान्यवरांनी लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
आद्य क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे, विक्रम भिलारे, प्रविण भिलारे, मिलिंद कासुर्डे, दलीत विकास आघाडी कामगार सुरक्षा दल, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव भिसे, तालुका सचिव अभिजीत (सनी) ननावरे, म.राज्य कामगार सुरक्षा दल महाबळेश्वर तालुका अध्यक्ष नितीन वन्ने, झोपडपट्टी सुरक्षा दल महाबळेश्वर तालुकाध्यक्ष ऋषिकेश वायदंडे, विकास भोसले, दादू कांबळे, राजेंद्र सोनवणे यांच्यासह उपस्थितांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच साहित्यसम्राट शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांनाही पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.