दौंड: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार राहुल कुल यांच्या मागणीनुसार खडकवासला जुना मुठा उजवा कालवा (बेबी कॅनॉल) च्या ६७ किलोमीटर लांबीच्या अस्तरीकरण व मजबूतीकरण या कामासाठी सुमारे १८८.७५ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे.
तसेच नवीन दौंड पोलीस स्टेशन इमारत, उपविभागीय पोलीस अधिकारी इमारत व पोलीस अधिकारी, कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी सुमारे ५५.५६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल बुधवारी आमदार राहुल कुल यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दौंड तालुक्याच्या जनतेच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री, देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. यावेळी आमदार जयकुमार गोरे हे देखिल उपस्थित होते.