पुणे : 22 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीला वाढदिवस साजरा करण्यासाठी अज्ञात ठिकाणी घेऊन गेला. आणि वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून अल्पवयीन मुलीकडे शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत 14 जुलै 2024 रोजी घडली आहे. याप्रकरणी तरुणाच्या विरोधात विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी आणि आरोपी हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी याचा 14 जुलै ला वाढदिवस होता. त्यानिमित्ताने आरोपीने पिडीतेला घरी जाऊ. असे सांगून अज्ञात ठिकाणी बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये असलेल्या खोलीत नेले. त्यानंतर पिडीतेला सांगितले आज माझा वाढदिवस आहे. तुझ्याकडून गिफ्ट पाहिजे, असे म्हणून पिडीतेकडे शारीरीक सुखाची मागणी केली.
त्यानंतर फिर्यादीने आरोपीने केलेल्या मागणीला नकार दिला. तेव्हा आरोपीने पिडीतेला मिठी मारुन विनयभंग केला. तसेच तुने इसके बारेमे किसको बताया, तो तेरा अब्बा मर जायेगा, अशी धमकी दिली. याप्रकरणी 17 वर्षाच्या मुलीने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीच्या विरोधात लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे करीत आहे.