-अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : पारगाव कारखाना पोलिस स्टेशनमध्ये तसेच मंचर पोलिस स्टेशनमध्ये चार वर्षांपासून साखर कारखाना येथील स्थानिक मुकादम यांच्याकडून पैसे उकळून त्यांना मजूर व वाहनांचा पुरवठा करतो, असे खोटे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक करणारा फरार असलेल्या आरोपीस आंबेगाव तालुक्यातील पारगाव कारखाना पोलिस स्टेशन ने जेरबंद केले.
आरोपी भीमा एकनाथ पवार हा ऊसतोड मुकादम यांना ऊस तोडणी व वाहतूक करण्यासाठी मजूर पुरवठा करतो, असा लेखी करारनामा केला. तसेच तोंडी बोलून लेखी करारनाम्यानुसार तक्रारदार यांच्याकडून 14 लाख 40 हजार रुपये घेऊन मजूर व वाहनांचा पुरवठा करतो, असे खोटे सांगून मजूर व वाहनांचा पुरवठा न करता तक्रारदारांची फसवणूक केली होती. त्या अनुषंगाने सुरेश रखमा रोहिले व त्यांचा भाऊ नबाजी रोहिले (रा. कवठे येमाई ता. शिरुर जि.पुणे) याच्या तक्रारीवरून पारगाव (कारखाना) पोलिस स्टेशन मध्ये भीमा एकनाथ पवार (वय 49 वर्षे रा. ओढरे ता. चाळीसगाव जि. जळगाव) याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास हा प्रभारी अधिकारी नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक लोकरे हे करीत होते. दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी नेताजी गंधारे यांनी पो. उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलिस हवालदार नरेंद्र गोराणे व पोलिस अंमलदार चंद्रकांत गव्हाणे या पथकास सदर आरोपी जेरबंद करण्यास सांगितले. सदर आरोपी यास दोन वेळेस पकडणे गेले असता पथकाची चाहूल लागताच सदरचा आरोपी हा पळून जात असे.
दरम्यानच्या काळात सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना पो. उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलिस हवालदार नरेंद्र गोराणे व पोलिस अंमलदार चंद्रकांत गव्हाणे यांना पुन्हा सदर आरोपीची खबऱ्या मार्फत बातमी मिळाली की सदरचा आरोपी हा त्याच्या गावी आला आहे. त्या अनुषंगाने तात्काळ पो. सई लोकरे व त्यांच्या पथकाने सापळा रचून आरोपीस ओढरे (ता. चाळीसगाव) येथून ताब्यात घेऊन पारगाव कारखाना पोलिस स्टेशन मध्ये सदर गुन्ह्यात अटक करून पोलिस कस्टडी रिमांड घेतले आहे.
आरोपीने अशा प्रकारचे गुन्हे अजून केले आहेत का? याबाबत आधिक तपास केला असता आरोपीने विविध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे केले असलेचे दिसून आले असुन तसेच त्याने आणखी काही शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. तरी सदर इसमाकडून कोणत्याही शेतकऱ्यांची फसवणूक झाली असल्यास उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे खेड विभाग, पुणे ग्रामीण संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
सदरची कामगिरी ही पोलिस अधीक्षक पंकज देशमुख पुणे ग्रामीण, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे खेड विभाग खेड पोलिस निरीक्षक उमेश तावसकर (सायबर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे पारगाव (कारखाना) पोलिसस्टेशन, पो. उपनिरीक्षक घोडके, पो.उपनिरीक्षक लोकरे, पो. हवा नरेंद्र गोराणे, पो.हवा देवानंद किर्वे, पो. हवा शांताराम सांगडे, पोलिस कॉन्स्टेबल चंद्रकांत गव्हाणे, पोलिस कॉन्स्टेबल संजय साळवे, पोलिस कॉन्स्टेबल मंगेश अभंग, पोलिस मित्र रामभाऊ वाळुंज यांनी सदर गुन्ह्याचा तपास केला आहे.