मुंबई : सध्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यात SIP अर्थात ‘सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’मध्ये गुंतवणूक वाढली आहे. कारण, यामधून चांगला परतावा मिळत असतो. असे असताना SIP फंड असा आहे त्यात 10000 रुपयांच्या गुंतवणुकीतून तब्बल 14 कोटींचे मालक बनवले आहे.
एसआयपीद्वारे म्युच्युअल फंड इक्विटी स्कीममध्ये गुंतवणूक केली तर काही वर्षे वाट पाहिल्यानंतर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. ‘फ्रँकलिन इंडिया ब्लूचिप फंड’ हे असेच एक उदाहरण आहे. ज्यामध्ये केवळ 31 वर्षांत 10000 रुपये प्रति महिना गुंतवणूक केल्याने ती रक्कम 13.64 कोटी रुपये झाली. एका गुंतवणूकदाराने जवळपास तीन दशकांपासून दरमहा 10000 रुपये गुंतवून त्याची एकूण गुंतवणूक 37.2 लाख रुपयांवरून 13.64 कोटी रुपये केली आहे. त्यानुसार, गुंतवणूकदाराला या गुंतवणुकीवर 18.5 वार्षिक परतावा मिळाला.
‘फ्रँकलिन इंडिया ब्लूचिप फंड’ ही सर्वात जुनी लार्ज कॅप इक्विटी म्युच्युअल फंड योजनांपैकी एक आहे, ज्याचा उत्कृष्ट ट्रॅक रेकॉर्ड आहे. फंड प्रामुख्याने ब्लू-चिप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यावर लक्ष केंद्रित करतो, त्याच्या पोर्टफोलिओपैकी सुमारे 80 टक्के लार्ज कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली जाते.