पुणे : पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. दहावीतील विद्यार्थ्यांला प्रेमाच्या जाळ्यात ओढून शिक्षिकेने त्याच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बालकांचे लैगिंक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) शिक्षिकेविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली. ही घटना शुक्रवारी खडक पोलीस स्टेशन हद्दीतील एका शाळेच्या आवारात घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत पीडित मुलाच्या आईने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत मुलगा एका शाळेत दहावीत शिक्षण घेत आहे. शुक्रवारी तो शाळेत दहावीची पूर्वपरीक्षा देण्यासाठी गेला होता. मुलगा शाळेत आल्यानंतर त्याच्या पालकत्वाची जबाबदारी शिक्षकांवर असते. मात्र, शिक्षिकेने मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्यावर शाळेच्या आवारात अत्याचार केले, अशी फिर्याद पीडित मुलाच्या आईने दिली आहे.
पीडित मुलाच्या आईला याबाबतची माहिती समजल्यानंतर त्यांनी शाळेच्या प्रशासनाकडे तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. या घटनेचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक तोंडे तपास करत आहेत.