मुंबई : आजची सकाळ जियो वापरकर्त्यांसाठी चांगलीच डोकेदुखी करणारी होती. सकाळी तब्बल तीन तास जियोची सेवा बंद असल्याचा अनुभव नागरिकांना आला. त्यामुळे सोशलमिडिया वापरकर्त्यानी ट्विटरवर तक्रारींचा पाढाच वाचला. काही ट्विटर वापरकर्त्यांनी तर थेट हीच का ५ जीची तयारी ? असे म्हणत जियो व्यवस्थापनाला खोचक प्रश्नांची साबरबत्ती केली.
आज सकाळपासूनच जियो कंपनीच्या वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी तब्बल तीन तास जियोचे वापरकर्ते फोन करू शकले नाहीत. यावर देखील सोशल मेडिया वापरकर्त्यांनी आपापल्या पेजेसवरून आगपाखड केली. अनेक वापरकर्त्यांना मेसेज अथवा एसएमएस करण्यास अडथळे येत असल्याचे सोशल मीडियावरून सांगण्यात आले.
दुपार पर्यंत मात्र सेवा पूर्ववत झाल्याचे स्टेटस अनेकांनी आपल्या पेजेसवर ठेवले होते. मात्र, अनेक वापरकर्त्यांना या संदर्भात कोणतीच समस्याच नव्हती ते मोबाईल डेटा वापरण्यास सक्षम असल्याचे जियोकडून सांगण्यात आले. मात्र, या काळात अनेकांनी जियोच्या सेवांचा ट्रेंड देखील चालवला.