सुरेश घाडगे
परंडा :परांडा तालुक्यात आज मंगळवारी ( दि. ११ ) झालेल्या मुसळधार परतीच्या पावसामुळे तालुक्यातील सिना कोळेगाव प्रकल्पाची एकूण २१ दारांपैकी १४ दारं उघडण्यात आली आहेत.तर १७ हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे . नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .
तालुक्यातील नदी नाले भरून वाहत आहेत . रब्बी ज्वारीची पेरणी केलेली शेतातील माती वाहून जाऊन पाणी साठून मोठे नुकसान झाले आहे . दरम्यान तालुक्यातील सिना काळेगाव प्रकल्पासह खासापुरी मध्यम प्रकल्प , चांदणी मध्यम प्रकल्प , साकत मध्यम प्रकल्प , पांढरेवाडी प्रकल्प सर्वच प्रकल्प ऑगष्ट मध्येच ओव्होरपलो झालेले आहेत .