अजित जगताप
सातारा : शिक्षक सेवकांना ही जुनी सेवानिवृत्त वेतन योजना लागू करणे, शिक्षण विभागातील विविध पदोन्नती करणे, शिक्षक रिक्त पदे भरणे यासह अनेक मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीच्यावतीने सातारा जिल्हा परिषदेच्या समोर शिक्षकांनी धरणे आंदोलन केले.
निवेदनात म्हटले आहे, गेल्या पाच सहा वर्षात केवळ दोन समिती नियुक्त करण्यापलिकडे शिक्षकांच्या मागण्याबाबत काहीच विचार केलेला नाही. त्यामुळे निर्णय अद्यापही प्रलंबीत आहे शाळेच्या आवारात शाळा खोल्या, संरक्षक भिंत बांधताना शिक्षक हजर असावे लागतात. दररोज एक उपक्रम अशा विविध उपक्रमांच्या नावाखाली जिल्हा परिषद शिक्षक कार्यरत असतात.
भोरच्या गट शिक्षणाधिकाऱ्याकडून सकाळी परिपाठ घेतला जातो आहे. सकाळी एक तास सामुदायिक चिंतन विद्यार्थ्यांनी करावे यासाठी वेळ दिला जात आहे, असे विविध उपक्रम असल्यामुळे आम्ही शिकवायचे तरी कधी? याचा प्रशासनाने विचार करणे गरजेचे आहे. पोषण आहार माहितीसाठी ऑफलाईन, ऑनलाईन माहिती द्यावे लागते. एक एक कागद अनेकवेळा दिला जावा लागतो आहे. हे कुठं तरी थांबलं पाहिजे. दरवर्षी एखाद्या विषयाचे ऑडिट केले. तर पुन्हा त्याची मागणी वारंवार केली जाते. त्यामुळे शिक्षकांची पिळवणूक बंद करावी,अशी मागणी केली जाते.
काही शाळेत शिक्षक,केंद्र प्रमुखांच्या सत्तर टक्के जागा रिक्त आहे,शिक्षण विस्ताराधिकारी, मुख्याध्यापक नाहीत काही ठिकाणी पदभार, पदोन्नती कित्येक महिने रखडली गेली आहे. अडीच वर्षात शिक्षण मंत्री यांनी संघटनांची बैठक घेतली नाही, ही मोठी खंत आहे. शाळांची आज भयानक अवस्था आहे. एम.एस. आय.टीचे प्रशिक्षण झाल नाही, याबाबत कधीच नोटीस दिली जात नाही. पण जेव्हा सेवा निवत्त होतात त्यावेळी याबाबतची रक्म वसुल केली जाते. यावर विचार होणे गरजेचे आहे. असे नमूद केले आहे.
या धरणे आंदोलनाला शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष उदय शिंदे, शिक्षक बँक अध्यक्ष राजेंद्र घोरपडे, शंकर देवरे, जिल्हाध्यक्ष रणनवरे,विठ्ठल माने,दिपक भुजबळ, सुरेश जेधे, राहुल कदम, बजीरंग वाघ,सुरेश गायकवाड, सौ संगीता सणस, सौ आशा बारसिंग, धनसिंग सोनावणे व सतिश जाधव,अनिल जाधव, उमेश पाटील व शिक्षक संघ, शिक्षक समिती, पुरोगामी शिक्षक संघटना व इतर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
डायट संस्था बंद करा
डायट मार्फत शिक्षकांना दिवसभर प्रशिक्षण दिले जाते. पूर्वी मोबाईल वापरण्यास बंदी होती. पण आज दिवसभर केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक, ग्रामसेवक यांना प्रशिक्षण सुरु असते. मोबाईलची बॅटरी तरी टिकली पाहिजे? प्रशिक्षण किती द्यावे याचं तरी भान असलं पाहिजे? या प्रशिक्षणाला एवढी मोठी गर्दी असते की,प्रक्षिणार्थीना काहीच समजत नाही. त्याचा फायदा काय होत आहे. याचे