सुरेश घाडगे
परंडा : शेळगाव (ता. परंडा) येथील ३३ केव्ही सबस्टेशन मधील झालेला बिघाड दुरुस्त करुन सबस्टेशन सुरळीत चालावा यासाठी महावितरण अधिकाऱ्यांना आदेश करावेत. असे निवेदन जिल्हा बँकेचे माजी संचालक अॅड. सुभाष मोरे यांनी आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनानुसार, शेळगांव येथील ३३ के.व्ही. सब स्टेशन गेल्या २ महिन्यापासुन नादुरुस्त असुन सदरिल सबस्टेशन ओव्हरलोड असल्यामुळे सबस्टेशनमध्ये सारखा घोटाळा होत आहे. त्यामुळे सबस्टेशन बंद पडत असुन त्या सबस्टेशन खालील १० गावांचा विद्युत पुरवठा बंद आहे. प्रत्येक फिडरला फक्त २ तासच विद्युत पुरवठा देत आहेत. शेती व गावठाण फिडर नेहमी बंद ठेवतात. शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे ८ तास विद्युत पुरवठा न करता मनमानीप्रमाणे अधिकारी विद्युत पुरवठा बंद ठेवतात.
दरम्यान, संबंधित अधिकारी व गुत्तेदार यांची चौकशी करुन विद्युत पुरवठा सुरळित करणेबाबत अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत व योग्य ती कार्यवाही करुन शेतकऱ्यांना योग्य दाबाने ८ तास विद्युत पुरवठा करण्यासाठी नविन ५ एमआयए चा ट्रान्सफार्मर बसविण्यात यावा. अशी मागणी निवेदनात अॅड. सुभाषराव मोरे यांनी केली आहे.