दीपक खिलारे
इंदापूर : राष्ट्रपिता महात्मा फुले, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील महापुरुषांविरोधात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ समस्त शिव-शाहू-फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने पुकारलेल्या इंदापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिव-शाहू-फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने पुकारलेला बंद हा दुपारी बारा वाजेपर्यंत ठेवण्यात आला होता. मात्र शहरातील व्यापाऱ्यांनी कमी-अधिक प्रमाणात संपूर्ण दिवसभर आपली आस्थापने बंद ठेवून उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला.
शिव-शाहू-फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने दुपारी बारा वाजेपर्यंत बंदच्या निर्णयावर रचना बझार ट्रस्टच्या व्यापारी व गाळेधारकांनी समाधान व्यक्त केले व बंदमध्ये सहभाग नोंदविला. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा मात्र बंद ठेवण्यात आल्या होत्या.