अजित जगताप
वडूज : येथील छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ, वडूज ता खटाव यांच्या वतीने आजादी की अमृत महोत्सव तसेच दादासाहेब गोडसे महाविद्यालय रौप्य महोत्सव यांच्या संयुक्त विद्यमाने देशभक्ती व मनोरंजनात्मक यादे रफी के नाम हा सदाबहार कार्यक्रम संपन्न झाला.
जेष्ठ नेते तथा संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब गोडसे, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख, नगराध्यक्षा मनिषा काळे,अनुराधा प्रभाकर देशमुख, उपनगराध्यक्ष मनोज कुंभार व विरोधी पक्षनेते जयवंतराव पाटील,स पो नि मालोजीराव देशमुख, प्राचार्य डॉ एस बी पाटील, सचिव व्ही आर गोडसे, पृथ्वीराज गोडसे,प्रा बाबासाहेब साबळे आदी मान्यवरांच्या हस्ते उद्घाघाटन करण्यात आले.
त्यानंतर ए मेरे वतन के लोगो,, तुम मुझे यु भुला ना पाओगे,,, मै तुलसी तेरे आगंन की,,, बेखुदी मै सनम,,, मुझे इशक है तुम्ही से, सोलाह बरस की,,, तुमसे अच्छा कौन है,,, बडी दूर से आई है,, क्या मौसम है,, लेखे जो खत तुझे,,अशी सदाबहार गीतांची मान्यवर गायक व गायिका सजल शिंदे, रियाज मुल्ला, उमेश घाडगे, राहुल कोळी,आदित्य कुलकर्णी, विवेक शिंदे, शशिकांत मोरे, बाळासाहेब पोळ,संतोष इंगळे, हणमंतराव खुडे गुरुदत्त धुरंधर, शंकर चव्हाण यांनी बरसात करून सर्वांचे दिलखुलास मनोरंजन केले.
दरम्यान, प्रारंभी महान गायक महंमद रफी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.
अक्षय थोरवे,दिलावर मुल्ला, सॊमनाथ खुडे, योगेश जाधव, इसाक मुल्ला,कविता गिरे, प्रसाद जगदाळे,शैलेंद्र वाघमारे, राहुल कोळी, रिहाल मुल्ला, डॉ चंद्रशेखर नांगरे, ऍड अनिल गोडसे,संतोष इंगळे डॉ संतोष गोडसे, अभय देशमुख आदी रसिकांनी प्रत्येक गीतांना भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल संयोजक यांनी मनःपूर्वक आभार मानले. रफी साहेब यांच्याबद्दल पत्रकार आयाज मुल्ला यांनी माहिती दिली तर प्रा व्ही बी घाडगे,प्रा डॉ के वाय धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला वडूज परिसरातील मान्यवरांच्या उपस्थितीने चांगलीच रंगत आली होती.