सुरेश घाडगे
परांडा :परंडा शहर व तालुक्यात सिमोल्लंघन तथा विजयादशमी आज बुधवारी (ता.५) सायंकाळी ७ वाजता उत्साहात संपन्न झाले.
परंडा शहरातील गारभवानी मंदिर बार्शी रोड येथे शस्त्र पुजन करुन धार्मिक विधीने आई राजा उदो उदो च्या जय घोषात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आपट्याची पान प्रतिकात्मकतेने सोनं म्हणून लुटण्यात आले . तर नागरिकांनी एकमेकांना आपट्याची पानं प्रतिकात्मक सोन म्हणून देत शुभेच्छा दिल्या .नागरिकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होती.
शहरातील भावीकभक्ताचे श्रद्धास्थान असलेल्या गारभवानी मंदिर येथे शस्त्र पुजन करुन धार्मिक विधी परंडा तहसिलदार रेणुकादास देवणीकर व पोलीस निरिक्षक सुनिल गिड्डे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पो . उपनि . हिंगे, परंडा ता . तलाठी संघाचे अध्यक्ष चंद्रकांत कसाब, माजी नगराध्यक्ष रमेशसिंह परदेशी, मकरंद जोशी, बाबा वांबुरकर , मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सोनवणे ,उपाध्यक्ष दत्ता मेहेर,सचिव उमेश सोनवणे, सहसचिव यलप्पा काळे, खजिनदार बाळासाहेब माकनीकर, शिवाजी सोनवणे, अरूण कानाडे , अमितसिंह ठाकूर, अझर पटेल, श्रावण पवार, अभी जाधव, आण्णासाहेब लोकरे, रणजित माने, अमर बनसोडे, संताजी सोनवणे, निरज घोरपडे, पिंटु चौतमहाल व भक्त उपस्थीत होते. तसेच गारभवानी मंदीर शिक्षक सोसायटी, भवानी शंकर मंदिर राजपुत गल्ली व भगवती मंदिर तसेच तालुक्यातील डोंजा येथील रेणूकामाता मंदीर, सिरसाव येथील महालक्ष्मी मंदिर व आवार पिंपरी येथील अंबाबाई मंदिर येथे नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापना करण्यात आली व धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले .