दिनेश सोनवणे
दौंड : नो सुविधा तर नो कर चा नारा देत बहुजन समाज पार्टी दौंड नगरपालिकेच्या प्रवेश द्वाराच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलन आज गुरुवारी ( ता. २२ रोजी करण्यात आले.
बहुजन समाज पार्टीच्या वतीने दौंड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी निर्मला राशीनकर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी विशाल सोनवणे, उमाकांत कांबळे,गोरख ननावरे,अमीन शेख, सुनील शिंदे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दौंड शहरातील सिद्धटेक रस्ता ते भीमनगर येथील रस्त्यावरील ड्रेनेज अवस्था बिकट झाली असून या ठिकाणी अपघात होण्याचा संभव आहे. मध्यरात्री पिण्याच्या पाणीचा पुरवठा कमी दाबात येत असल्याने,याचा त्रास महिलांना होत असून. याचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर होत आहे.
सन २०१० ते २०१५ या पाच वर्षातील दिव्यांग बांधवांचा निधी न.पा. कडे शिल्लक आहे. तो निधी दिव्यांग बांधवांच्या खात्यावर जमा करावा. कचरा डेपो करिता न.पा. कडे जागा नसल्याने शहरात ठीक ठिकाणी कचरा साचत असून शहरात दुर्गंधी पसरत आहे. महिलांकरिता शहरात सार्वजनिक सौचालय नसल्याने महिलांची गैर सोय होत आहे. असे निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, नगरपालिकेचे मुख्य काम शहरातील नागरिकांना नागरी सुविधा देणे हे काम असते पण नागरिकांनी कर भरून सुद्धा सुविधा देत नसतील तर कर का भरावा. असा प्रश्न धरणे आंदोलन करण्याऱ्या व्यक्तींना उपस्थित केला आहे.