मुंबई : इंधनापाठोपाठ आता सीएनजी – पीएनजीच्या दरात अनुक्रमे 3 आणि ५ रुपयांनी वाढ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका बसला आहे. हे दर आज शनिवारपासून लागू होणार आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नैसर्गिक गॅसच्या किंमती वाढल्या आहेत. दुसरीकडे डॉलरचं मूल्य वाढलं असून रुपया नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. 1 डॉलरसाठी 82 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचा परिणामही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर होत असल्याचं दिसत आहे. दुसरीकडे महागाई वेगानं वाढत आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मंदीचे संकेत दिसत आहे.
द्रप्रस्थ गॅस लिमिटेड ने ८ ऑक्टोबरपासून दिल्ली-NCR सह इतर काही शहरांमध्ये घरगुती पाइप्ड नॅचरल गॅस सीएनजी – पीएनजीच्या किमती वाढवल्या आहेत. सीएनजीच्या दरात किलोमागे तीन रुपयांची वाढ केली.
दरम्यान, मुंबईत ४ ऑक्टोबरपासून सीएनजी ८६ रूपये प्रति किलो तर पीएनजीसाठी दर ५२ रूपये 50 पैसे मोजावे लागत आहेत. तर पुण्यात सीएनजी सोमवारपासून 4 रुपयांनी महाग केला आहे. दिवाळीआधी दर वाढल्याने सर्वसामान्य लोकांचा खिसा रिकामा होणार आहे. मुंबईत सीएनजी ६ तर पीएनजी ४ रूपयांनी महागला आहे.
जुने दर कंसात नवीन दर
१) दिल्ली सीएनजी – ७५.६१ (७८.६१)
२) नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबाद ७८.१७ (८१.१७)