उरुळी कांचन, (पुणे) : कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील येथील विमल अर्जुनराव शितोळे (वय-६१) यांचे सोमवारी (ता. २६) रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. कोरेगाव मूळ येथील सामाजिक कार्यकर्ते व नर्सरी व्यावसायिक दिलीप शितोळे यांच्या त्या मातोश्री होत. अंत्यविधी आज सकाळी दहा वाजता कोरेगाव मूळ येथे होणार आहे.