उरुळी कांचन, (पुणे) : येथील जयवंतराव (आण्णा) बळवंतराव जगताप (वय-९३) यांचे सोमवारी (ता. १७) वृद्धापकाळाने पहाटे निधन झाले.
सार्वजनिक बांधकाम विभागात चाळीस वर्षे निरंतर सेवा केली. तसेच त्यातील महत्वाचा रस्ता म्हणजे पाटस – बारामती हा रस्ता त्यांच्याच देखरेखीखाली करण्यात आला होता.
त्यांच्या पश्चात सहा मुले, सुना, नातवंडे, परतुंडे असा मोठा परिवार आहे. पुणे जिल्हा पत्रकार संघाचे समन्वयक व उरुळी कांचन येथील दैनिक लोकमतचे वार्ताहर सुनील जगताप यांचे ते वडील होत.