अजित जगताप
सातारा : उद्योग संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED), पुणे आयोजित आणि महाराष्ट्र उद्योजक, व्यापार व गुंतवणुक सुलभता कक्ष (MAITRI) मुंबई यांच्या सहकार्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजने अंतर्गत अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी १८ दिवसीय निःशुल्क निवासी उद्योजकता विकास कार्यक्रम (REDP) करिता उद्योजकता परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, सातारा जिल्हा उद्योग केंद्र, जुनी एम. आय. डी. सी. सातारा येथे उद्योगातून समृध्दीकडे LET US GROW TOGETHER जाण्यासाठी हा परिचय मेळावा आहे. मेळाव्याचे निकष पुढीलप्रमाणे
• उद्योजकतेकरिता आवश्यक असलेले गुण व उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास.
• शासकीय निमशासकीय संस्थांच्या यंत्रणांच्या विविध कर्ज योजना, सोयी-सवलती आणि कार्यप्रणाली. विविध क्षेत्रातील उद्योग संधीबाबत मार्गदर्शन, उद्योगाची निवड, बाजारपेठ पाहणी, सर्वेक्षण तंत्र, उद्योग व्यवसायाशी निगडीत कायदे व ते अंमलबजावणीची कार्यपध्दती.,प्रशिक्षण निवड होण्यासाठी किमान अटी व पात्रता ठेवण्यात आली आहे.
● प्रशिक्षणार्थीची निवड मुलाखती द्वारे केली जाईल. रहिवासी उमेदवार हा अनुसुचित जाती
प्रवर्गातील किमान १५ वर्षांपासून महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावा. शैक्षणिक पात्रता : किमान ७ वी पास, १० वी पास उमेदवारांना तसेच महिलांना प्राधान्य, वयोमर्यादा : किमान १८ कमाल ४५ वर्षे ,स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्याची प्रबळ इच्छा ,कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.अशी अट आहे.
सिध्दी प्रेरणा प्रशिक्षण, उत्पादनाच्या किमती, हिशोब इतर लेखाविषयक बाबी, प्रकल्प अहवाल तयार करणे. उद्योगास प्रत्यक्ष भेटी, उद्योजकांचे अनुभव कथन, Marketing /
Digital Marketing उद्योगाचे व्यवस्थापन, वित्तीय व्यवस्थापन मनुष्यबळांचे व्यवस्थापन, पणन व्यवस्थापन, उद्योग आधार नोंदणी,
उद्योग उभारणीत येणाऱ्या संभाव्य अडचणी व इतर गोष्टी बाबत ही या मेळाव्यात मार्गदर्शन मिळणार आहे अशी माहिती जिल्हा उधोग केंद्र महाव्यवस्थापक उमेशचंद्र दंडगव्हाळ, पुणे विभागीय अधिकारी सुदाम पोटे, डी पी ओ सौ शितल पाटील यांनी दिली आहे.