नवी दिल्ली : पोलीस खात्यात नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. उलट मुलाखतीद्वारेच पदांवर निवड केली जात आहे. ही भरती आसाम राज्यस्तरीय पोलीस भरती मंडळाकडून केली जात आहे.
जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, भरती प्रक्रियेद्वारे कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल, एसआय आणि इन्स्पेक्टर या पदांवर भरती केली जाणार आहे. एकूण 332 पदांच्या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. यामध्ये कॉन्स्टेबलची 200, हेड कॉन्स्टेबलची 70, सब इन्स्पेक्टरची 60 आणि इन्स्पेक्टरची 2 पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी 1 सप्टेंबरपासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.
अर्ज प्रक्रिया 15 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट slprbassam.in वर जाऊन अर्ज सबमिट करू शकतील.
काय असेल पात्रता?
कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबल या पदांसाठी कॉन्स्टेबल ते हवालदार आणि सैन्यातील समकक्ष पदांवर निवृत्त झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. दुसरीकडे, उपनिरीक्षक आणि निरीक्षक या पदांसाठी नायब सुभेदार किंवा त्याहून अधिक पदावरील सैन्यातून निवृत्त झालेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
वयोमर्यादा काय?
या पदांसाठी कमाल वयोमर्यादा 50 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
कशी निवड होईल?
या भरतीअंतर्गत उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. भरतीमध्ये, लष्करी पोलीस, विशेष दल, विशेष कौशल्य, प्रशिक्षण पार्श्वभूमी, ज्यांचे वय 45 वर्षांपेक्षा कमी आहे अशा उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
पगार किती मिळेल?
निरीक्षक – 22000 – 97000 ग्रेड पे 10300 अंतर्गत दरमहा,
उपनिरीक्षक – ग्रेड पे 8700 अंतर्गत 14000 – 60500 प्रति महिना, कॉन्स्टेबल – 14000 – 60500 रुपये.