Job Alert: पुणे : सरकारी नोकरी मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. त्यासाठी प्रयत्नही केले जातात. पण काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. मात्र, आता तुमचा हा शोध संपण्याची शक्यता आहे. कारण, पश्चिम रेल्वेच्या जगजीवनराम रुग्णालयात विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे.
या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. मेडिसिन जीडीएमओ-सीएमपी, रेडिओलॉजी सीएमपी-स्पेशालिस्ट, ऑर्थोपेडिक सीएमपी-स्पेशलिस्ट, डेंटल सीएमपी-जीडीएमओ, अर्धवेळ डेंटल सर्जन या पदांसाठी ही भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला चांगला पगार मिळू शकतो. या भरती प्रक्रियेत अर्ज करणाऱ्या उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
जाणून घ्या भरती प्रक्रियेसंदर्भात सर्वकाही…
– पदाचे नाव : मेडिसिन जीडीएमओ-सीएमपी, रेडिओलॉजी सीएमपी-स्पेशालिस्ट, ऑर्थोपेडिक सीएमपी-स्पेशलिस्ट, डेंटल सीएमपी-जीडीएमओ, अर्धवेळ डेंटल सर्जन.
– एकूण रिक्त पदे : 05 पदे.
– नोकरी ठिकाण : मुंबई.
– वेतन / मानधन : 36,900/- ते 1,05,000/- रुपयांपर्यंत.
– वयोमर्यादा : कमाल वयोमर्यादा 67 वर्षे आहे.
– निवड प्रक्रिया : यामध्ये संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
– मुलाखतीची तारीख : 4 डिसेंबर 2023.
– मुलाखतीची पत्ता : 7 वा मजला, संलग्नक इमारत, जगजीवनराम हॉस्पिटल, पश्चिम रेल्वे, मुंबई सेंट्रल, मुंबई 400 008.
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://wr.indianrailways.gov.in/ वरून माहिती घेता येऊ शकणार आहे.