Job Alert: पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, ठाणे महापालिकेत विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
ठाणे महापालिकेत स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, शल्य चिकित्सक, फिजिशियन, भुलतज्ञ, नेत्र शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका / स्टाफ नर्स, प्रसाविका, बायोमेडिकल इंजिनियर या पदांसह इतर अनेक पदांवर भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला ठाणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 293 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
जाणून घ्या भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : फिजियोथेरपिस्ट, डायटेशियन, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पिच थेरपिस्ट, पब्लिक हेल्थ नर्स, मेडिकल रेकॉर्ड किपर, सायकॅट्रिक कौन्सिलर, वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक, सायकॅट्रिक सोशल वर्कर, ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर यासह इतर अनेक.
– एकूण रिक्त पदे : 293 पदे.
– नोकरीचे ठिकाण : ठाणे.
– शैक्षणिक पात्रता : एसएससी, एचएससी, जीएनएम नर्सिंग, एएनएम, पदवी पदवी.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 18,000/- ते रु. 1,10,000/- पर्यंत.
– वयोमर्यादा : 18–38 वर्षे (मागासवर्गीय : 43 वर्षांपर्यंत).
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 26, 27, 28, 29 फेब्रुवारी आणि 01 मार्च 2024 सकाळी 11 वाजता
– मुलाखतीचा पत्ता : के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://thanecity.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.