Job Alert: पुणे : सरकारी नोकरी मिळावी यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यामध्ये काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण आता ‘रजिस्ट्रार ऑफ फर्म महाराष्ट्र’ या विभागात रिक्त पदावर भरती केली जात आहे. यामध्ये एकूण एक रिक्त पद भरले जाणार आहे. या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे.
‘रजिस्ट्रार ऑफ फर्म महाराष्ट्र’मध्ये चालक या पदावर भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी 8 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवाराला यामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. यासाठी वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली असून, 38 वर्षापर्यंत वय असणारा उमेदवार यासाठी अर्ज करू शकणार आहे. संबंधित उमेदवाराला ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : चालक.
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण
– वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 19,900/- ते रु. 63,200/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 24 नोव्हेंबर 2023.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 डिसेंबर 2023.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता / अर्ज सादर करण्याचा पत्ता : निबंधक भागीदारी संस्था, महाराष्ट्र राज्य, मुंबई, नवीन प्रशासकीय इमारत, ६ वा मजला, शासकीय वसाहत, वांद्रे (पुर्व), मुंबई-४०० ०५१.