Job Alert: पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, मुंबई येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, मुंबई येथे वैद्यकीय अधिकारी आणि अभियंता या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 6 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी आणि अभियंता.
– एकूण रिक्त पदे : 06 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई
– शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस, बी.ई, बी.टेक, बी.एस्सी.
– वेतन / मानधन : दरमहा 40,000 ते 1,40,000 पर्यंत.
– वयोमर्यादा : 34-37 वर्षे (वैद्यकीय अधिकारी), 30 वर्षे (अभियंता).
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 17 जानेवारी 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2024.
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहिती https://www.rcfltd.com/ या अधिकृत वेबसाईटवरून घेता येणार आहे.