पुणे : चांगली नोकरी मिळाली, असे अनेकांना वाटत असते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, पिंपरी-चिंचवडमध्ये अग्निशमन विभागात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये अग्निशमन विभागात अग्निशमन विमोचक / फायरमन रेस्क्युअर या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 150 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : अग्निशमन विमोचक / फायरमन रेस्क्युअर.
– एकूण रिक्त पदे : 150 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 26 एप्रिल 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मे 2024.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.pcmcindia.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.