पुणे : चांगली नोकरी मिळाली, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यानुसार, तयारीही केली जाते. मात्र, आता तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, पुण्यातील ‘नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स’ येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
‘नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स’, पुणे येथे वरिष्ठ रिसर्च फेलो आणि यंग प्रोफेशनल-II या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण चार रिक्त पदे भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 42 हजारांपर्यंत पगार मिळणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वरिष्ठ रिसर्च फेलो आणि यंग प्रोफेशनल-II.
– एकूण रिक्त पदे : 04 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 31,000/- ते रु.42,000/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 मे 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : संचालक, ICAR नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पी.बी. क्र.-3, मांजरी फार्म पोस्ट, सोलापूर रोड, पुणे- 412307.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://nrcgrapes.icar.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.