पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रकियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत अर्ज करण्याची 11 डिसेंबर 2023 ही शेवटची तारीख असणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नाशिक येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक.
– एकूण रिक्त पदे : 21 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नाशिक.
– वेतन / मानधन : रु. 1,00,000/- ते रु. 1,85,000/- पर्यंत.
– वयोमर्यादा : 69 वर्षांपेक्षा कमी
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 7 डिसेंबर 2023.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 डिसेंबर 2023.
– अर्ज सादर करण्याचा पत्ता : अधिष्ठाता, महाराष्ट्र पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर, एमयूएचएस नाशिक, जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल कंपाऊंड, अनंत कान्हेरे मैदानासमोर, त्र्यंबक रोड, नाशिक – 422 001.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.muhs.ac.in/ वरून माहिती घेता येणार आहे.