पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई येथे वैज्ञानिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक (सायबर गुन्हे, टेप प्रमाणीकरण आणि स्पीकर ओळख), वैज्ञानिक सहाय्यक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 125 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वैज्ञानिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक (सायबर गुन्हे, टेप प्रमाणीकरण आणि स्पीकर ओळख), वैज्ञानिक सहाय्यक (मानसशास्त्र), वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक.
– एकूण रिक्त पदे : 125 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– शैक्षणिक पात्रता : एसएससी, एचएससी (विज्ञान), पदवी पदवी उत्तीर्ण.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 29,200/- ते रु. 1,12,400/- पर्यंत.
– वयोमर्यादा : खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे आणि राखीव प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : 1000/-, राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) : 900/-
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 06 फेब्रुवारी 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 फेब्रुवारी 2024.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.dfsl.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.