पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, राज्याच्या शालेय शिक्षण विभागात विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
शालेय शिक्षण विभागात स्वयंसेवक (Volunteer) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 200 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. स्वयंसेवक या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, महात्मा गांधी व्यसनमुक्ती केंद्र तळणी, विश्वनाथ विद्यालयाशेजारी शिरपूर रोड, तळणी ता. मंठा जि. जालना येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहिती https://education.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : स्वयंसेवक.
– एकूण रिक्त पदे : 200 पदे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 01 एप्रिल 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2024.