पुणे : लातूर जिल्हा न्यायालय येथे अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 47,600 रूपयांपर्यंत पगार मिळू शकतो.
लातूरच्या जिल्हा न्यायालयात सफाई कामगार या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला लातूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 13 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सफाई कामगार
– एकूण रिक्त पदे : 13 पदे.
– नोकरीचे ठिकाण : लातूर.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 15,000/- ते रु. 47,600/- पर्यंत.
– वयोमर्यादा : 18-38 वर्षे (मागासवर्गीय : 5 वर्षांची सूट).
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 30 एप्रिल 2024
– अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024.
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://latur.dcourts.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे