पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिका/नगरपालिका सदस्य, पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रतिनिधी यासह इतर अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला कोल्हापूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 18 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिका/नगरपालिका सदस्य, पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रतिनिधी, शाळा/कॉलेज प्रतिनिधी, वैद्यकीय व्यावसायिक प्रतिनिधी, व्यापार व उद्योग क्षेत्र, पेट्रोल व गॅस विक्रेते प्रतिनिधी व शेतकरी प्रतिनिधी.
– एकूण रिक्त पदे : 18 पदे.
– नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://kolhapur.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.