Job Update: पुणे : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, ‘इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्स’ पुणे येथे विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यासाठी 17 नोव्हेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
‘इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्स’ अर्थात IUCAA मध्ये एकूण पाच जागांसाठी भरती केली जात आहे. यामध्ये प्रशासकीय अधिकारी (कार्मिक), प्रशासकीय अधिकारी (खरेदी), रिसेप्शनिस्ट / टेलिफोन ऑपरेटर, झेरॉक्स ऑपरेटर / डिस्पॅचर, सहाय्यक हिंदी अनुवादक या जागांवर भरती होणार आहे.
या भरती प्रक्रियेत चाचणी आणि मुलाखतीच्या माध्यमातून संबंधित उमेदवाराची निवड केली जाणार आहे. यात निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे येऊन नोकरी करावी लागणार आहे. यामध्ये ऑनलाईन (ई-मेल) माध्यमातून अर्ज करता येऊ शकणार आहे. त्यासाठी संबंधित उमेदवार [email protected] on या ई-मेल आयडीवर अर्ज पाठवू शकणार आहेत.
जर तुम्हाला या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती हवी असेल तर त्यासाठी अधिकृत वेबसाईट https://www.iucaa.in/ वरून माहिती घेता येऊ शकणार आहे.