Job Alert: पुणे : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, गडचिरोली जिल्हा न्यायालयात विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रकियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
गडचिरोली जिल्हा न्यायालयात लघुलेखक (ग्रेड-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई / हमाल या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत अर्ज करण्याची 18 डिसेंबर 2023 ही शेवटची तारीख असणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला गडचिरोली येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : लघुलेखक (ग्रेड-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल.
– एकूण रिक्त पदे : 42 पदे.
– नोकरीचे ठिकाण : गडचिरोली.
– वेतन / मानधन : रु. 15,000/- ते रु. 1,22,800/- पर्यंत.
– वयोमर्यादा : १८-३८ वर्षे अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 4 डिसेंबर 2023.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 डिसेंबर 2023.
या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://districts.ecourts.gov.in/gadchiroli वरून माहिती घेता येणार आहे.