पुणे : नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर आम्ही तुम्हाला एका चांगल्या नोकरीची माहिती देणार आहोत. कारण, डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली, रत्नागिरी येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली, रत्नागिरी येथे कार्यालयीन सहाय्यक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला रत्नागिरी येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 1 रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
ऑफलाईन अर्ज करावा लागणार असणार असल्याने मा. प्रभारी अधिकारी, विद्यापीठ ग्रंथालय, डॉ. बा. सा. कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.dbskkv.org/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : कार्यालयीन सहाय्यक.
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : रत्नागिरी.
– शैक्षणिक पात्रता : पीएच.डी. किंवा पदव्युत्तर पदवी.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 15,000/-
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 ऑक्टोबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा.प्रभारी अधिकारी, विद्यापीठ ग्रंथालय, डॉ.बा.सा.कोकण कृषि विद्यापीठ, दापोली.