पुणे : महापालिकेच्या सेवेत ५० तृतीय पंथीयांना सहभागी करून घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी महापालिकेने त्यांच्यासाठी स्वतंत्र मूलभूत सुविधा देखील तयार केल्या आहेत. यामध्ये स्वतंत्र स्वच्छतागृह आदींचा समावेश आहे.
तसेच महापालिका कर्मचाऱ्यांनादेखील त्यांच्यासोबत सौहार्दाचे, सलोख्याने वागण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २८ जणांना कामावर घेतले जाणार असून, त्यांना उद्यान विभाग, हॉस्पिटल आणि अतिक्रमण विभागात काम दिले जाणार आहे.
दरम्यान, तृतीय पंथीयांना महापालिका सेवेत घ्यावी अशी मागणी सामाजिक संघटनांनी महापालिकेकडे केली होती. त्यानुसार सामाजिक बांधिलकीतून महापालिकाही तृतीय पंथीयांना नोकरी देणार असून, त्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महापालिका आयुक्तांसमोर ठेवण्यात येणार आहे.