नवी दिल्ली : भारतीय लष्कराकडून अग्निवीर योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत अल्प कालावधीसाठी लष्करात भरती केली जात आहे. आता या भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा लवकरच सुरु होणार आहे. हा टप्पा भारतीय लष्कराच्या आवश्यक प्रक्रियेत बदल करण्याच्या दृष्टीने आणि इच्छुक उमेदवारांसाठी निवड प्रक्रिया सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नांमध्ये महत्त्वाचा मानला जातो.
2022 मध्ये केंद्र सरकारने तीन सेवांसाठीची वयोमर्यादा कमी करण्याच्या उद्देशाने अल्पकालीन कालावधीत भरतीसाठी अग्निपथ भरती योजना सुरू केली आहे. अग्निपथ योजनेत 17.5 ते 21 वर्षे वयोगटातील तरुण चार वर्षांसाठी लष्कराच्या सेवेत असणार आहेत. अशी भरती प्रक्रियेची तरतूदही आहे. त्यापैकी 25 टक्के आणखी 15 वर्षे ठेवण्याची तरतूद आहे.
दरम्यान, नवीन भरती प्रणालीचा भाग म्हणून, देशभरात पहिल्या टप्प्यात एप्रिल-मे 2024 मध्ये ऑनलाईन सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर आता या प्रक्रियेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. ही भरती प्रक्रिया विनामूल्य आणि पारदर्शक आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या एजंटशी संपर्क साधू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.