पुणे : सरकारी नोकरी मिळावी यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. त्यात तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन या पद्धतीने अर्ज करता येणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद येथे तांत्रिक पर्यवेक्षक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला परभणी येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण एक रिक्त पद भरले जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. अर्ज प्रक्रियेला आजपासून अर्थात 22 ऑगस्ट 2024 पासून सुरुवात झाली आहे. यासाठी 29 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. यात निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्जही करता येणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराला 17 हजारांपर्यंत पगार मिळणार आहे. त्यासाठी संबंधित उमेदवारांना आवक/ जावक विभाग, जिल्हा रुग्णालय परभणी येथे अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://mahasbtc.org/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.