TCS Variable Pay News : देशातील सर्वात आघाडीवर असलेली टाटा समूहातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेडने (TCS) आता नवा नियम जारी केलेला आहे. कंपनीच्या नवीन धोरणानुसार ज्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती 60 टक्क्यांपेक्षा कमी आहे त्यांना तिमाही बोनस दिले जाणार नाहीयेय. IT Co. ने नुकतेच कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाच दिवस ऑफिसला येण्यास सांगितले होते. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमधून काम करणे बंधनकारक करुनही अनेक कर्मचारी ऑफिसमध्ये येत नव्हते.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कंपनीच्या नवीन धोरणात असे म्हटले आहे की, जे कर्मचारी ऑफीस कार्यालयात आले नाहीत त्यांना तिमाही बोनस दिला जाणार नाहीयेय. त्रैमासिक बोनसचा लाभ घेण्यासाठी ऑफिसमधील उपस्थिती तुमची 60 ते 75 टक्क्यांच्या दरम्यान असावी. ज्या कर्मचाऱ्यांची ऑफिसमधील उपस्थिती 75 ते 85 टक्के आहे त्यांना 75 टक्के व्हेरिएबल पे देण्यात येणार आहे.
TCS शेअर बाजारात 2004 मध्ये लिस्ट झाली. गेल्या 19 वर्षांत प्रथमच वर्षभरात कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झालेली आहे. वर्ष-दर-वर्ष आधारावर, कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत आर्थिक वर्षासाठी 13 हजार 249 पेक्षा जास्त घट झाली आहे.
व्हेरिएबल पे कोणाला किती मिळेल?
– ज्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती 75 ते 85 टक्क्यांदरम्यान आहे त्यांना 75 टक्के व्हेरिएबल पे मिळेल.
– ज्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती 85 टक्के आहे त्यांना पूर्ण व्हेरिएबल पे मिळेल.
– जे कर्मचारी 60 टक्क्यांपेक्षा कमी दिवस ऑफिसमध्ये येतात त्यांना कोणतेही व्हेरिएबल पे मिळणार नाही.
– याशिवाय ज्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती 60 ते 75 टक्क्यांदरम्यान आहे त्यांना 50 टक्के व्हेरिएबल पे मिळेल.